मुंबई :
'पद्मावत' सिनेमातील महाराणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोणचं खूप कौतुक झालं. आता पुन्हा एकवार ती स्त्रीकेंद्री सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज करतोय. या सिनेमात दीपिका एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे.
दीपिकाने एका कार्यक्रमात या भूमिकेबद्दल सांगितलं की 'ही भूमिका एका गँगस्टरची आहे. 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. ही एक सत्यकथा आहे. या भूमिकेसाठी मी खूप तालीम करत आहे. यात माझ्या भूमिकेसाठी शारीरिक श्रमाची अधिक गरज आहे. या सिनेमाच्या निमित्ताने महिलेची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचेल, ती सर्वांना कळायलाच हवी.'
या सिनेमात दीपिका अभिनेता इरफान खानसोबत दिसेल. यापूर्वी या दोघांनी 'पिकू' सिनेमात काम केलं होतं. २०१८ च्या अखेरपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.