मुंबई:
'पद्मावत' नंतर अभिनेत्री दीपिका पडुकोण आणखी एक स्त्रीप्रधान भूमिका साकारणार आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालचा संघर्ष दीपिका 'छपाक' या बायोपिकमधून मांडणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
दीपिकानं ट्विट करत हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'ही अशी भूमिका आहे जी कायम माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहणार आहे. आजपासून छपाकच्या चित्रीकरणाला आम्ही सुरुवात करत आहोत. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.' असं तिनं फोटो शेअर करताना लिहिलं आहे.
'छपाक' या बायोपिकमध्ये दीपिकाच्या भूमिकेचं नाव 'मालती' असणार आहे. या चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकत आहे. 'छपाक'चं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे.