अ‍ॅपशहर

अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग

नाटककार आणि साहित्य अकादमी विजेते कथाकार जयंत पवार यांची ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही वेगळ्या रूपबंधाची दीर्घ कथा साहित्य वर्तुळात खूप गाजली. या कथेच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे सध्या महाराष्ट्रभर करत आहेत. हा प्रयोग मुंबईत १ एप्रिल २०१६ रोजी रात्री ८ वाजता यशवंत नाट्य मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Maharashtra Times 1 Apr 2016, 12:56 am
नाटककार आणि साहित्य अकादमी विजेते कथाकार जयंत पवार यांची ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही वेगळ्या रूपबंधाची दीर्घ कथा साहित्य वर्तुळात खूप गाजली. या कथेच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे सध्या महाराष्ट्रभर करत आहेत. हा प्रयोग मुंबईत १ एप्रिल २०१६ रोजी रात्री ८ वाजता यशवंत नाट्य मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुण्यातील ‘आसक्त’ नावाच्या नाट्य संस्थेची रिंगण नावाचा प्रकल्पात वाचनाचे विविध प्रयोग होतात. त्यातील ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ हा विशेष लक्षवेधी ठरलेला प्रयोग. या अनोख्या नाट्यकृतीचे अभिवाचन, दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केलं आहे. या कथेचं वैशिष्ट हे की, ही कथा इतर सरधोपट कथांपेक्षा वेगळी आहे ही रहस्यमय कथा अनेक पातळ्यांवर फिरते. या अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग ‘नाटकघर’ या संस्थेतर्फे होणाऱ्या या प्रयोगाला मुंबईच्या ‘अस्तित्व’ या संस्थेचे सहाय्य लाभले आहे. प्रयोगाचा कालावधी दीड तास असून त्याच्या प्रवेशिका प्रयोगाच्या आधी दोन तास नाट्यगृहावर उपलब्ध होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhivachan
अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग


कधी : १ एप्रिल २०१६ रोजी,

रात्री ८ वाजता

कुठे : यशवंत नाट्य मंदिर, माहीम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज