अ‍ॅपशहर

चेटकिणीनं भरभरुन हसवलं!

रविवार सकाळी दहा-सव्वादहाची वेळ. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये नाटकाला आलेल्या त्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं. हातात नाटकाचं तिकीट पडलं आणि त्यांना उत्सुकता लागली ती चेटकिणीला पाहायची.

Maharashtra Times 31 Jul 2018, 1:00 pm
मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम galbatya


रविवार सकाळी दहा-सव्वादहाची वेळ. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये नाटकाला आलेल्या त्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं. हातात नाटकाचं तिकीट पडलं आणि त्यांना उत्सुकता लागली ती चेटकिणीला पाहायची. ही मुलं होती गरीब घरांमधली. 'अलबत्या गलबत्या' हे नाटक पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती. अशा एकूण पन्नास मुलांना हे नाटक अलीकडेच दाखवण्यात आलं.

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी 'वंचितांचा रंगमंच' हा प्रकल्प चालवत आहेत. किशोरवयीन मुलांना नाट्यकलेकडे वळवण्यासाठी यातून प्रयत्न केले जातात. या अंतर्गत गरीब घरातल्या मुलांना, अनाथ मुलांना नाटकाचं प्रशिक्षण दिलं जातं. मतकरी यांच्या पुढाकारानं या मुलांना 'अलबत्या...' नाटकाचा प्रयोग दाखवण्यात आला. नाटक सुरू झाल्यावर ही मुलं त्यात रमून गेली होती. नयन दंडवते, अनघा काकडे, पार्थ कांबळे यांच्यासह एकूण पन्नास मुलांनी या प्रयोगाचा आनंद घेतला. चेटकिणीच्या करामती पाहून ही मुलं खदखदून हसत होती. नाटक संपल्यावर मुलांनी वैभव मांगले यांना गराडा घातला. चेटकिणीचे कपडे, मेकअप हे सगळं ते टकामका पाहत होते. नंतर अभिनेता वैभव मांगलेनं या मुलांशी गप्पाही मारल्या. 'ही करामती चेटकिण आम्हाला खूप आवडली. तिनं आम्हाला पोट धरुन हसायला लावलं', अशी प्रतिक्रिया त्यापैकी अनेक मुलांनी प्रयोगानंतर व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज