अ‍ॅपशहर

‘ओवी’ गुजरातीत जावी

महिन्याभरापूर्वी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं 'ओवी' हे नाटक लवकरच गुजराती रंगभूमीवरही येणार आहे. मूळ मराठी नाटकाचा लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील हाच गुजराती नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे.

Maharashtra Times 16 May 2018, 1:46 pm
कल्पेशराज कुबल, साठ्ये कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ovee


महिन्याभरापूर्वी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं 'ओवी' हे नाटक लवकरच गुजराती रंगभूमीवरही येणार आहे. मूळ मराठी नाटकाचा लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील हाच गुजराती नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. प्रसिद्ध लेखक इम्तियाज पटेल 'ओवी'चं गुजराती भाषांतर करत आहेत. विशेष म्हणजे अनिकेतचं मराठी रंगभूमीवरील 'ओवी' हे पहिलंवहिलं व्यावसायिक नाटकं आहे. आणि आता याच नाटकाच्या निमित्तानं तो आता गुजराती रंगभूमीवर देखील पदार्पण करतोय.

मराठी रंगभूमी आणि गुजराती रंगभूमी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संहितांची देवाणघेवाण होत आहे. मराठी नाटकं गुजरातीत तर गुजराती नाटकं मराठीत भाषांतरित होऊन सादर केली जातात. 'कोडमंत्र', 'आई तुला कुठे ठेऊ', 'वेलकम जिंदगी' यासारखी गुजरातीतून मराठीत आलेली नाटकं असोत किंवा 'सही रे सही', 'गोष्ट तशी गंमतीची' यासारखी मराठीतून गुजरातीत गेलेली नाटकं अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यात आता 'ओवी'ची भर पडणार आहे.

एक अनोखा थरारक अनुभव देणाऱ्या 'ओवी' या मराठी नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सध्या सुरू आहेत. सादरीकरणातल्या वैविध्यतेमुळे हे नाटक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मूळ एकांकिकेवरुन त्याचं व्यावसायिक नाटक करण्यात आलं. नाटकातला हाच थरार गुजराती प्रेक्षकांनाही अनुभवता यावा यासाठी अभिनेते निर्माते महेश मांजरेकर आणि अजय कासुर्डे यांनी 'ओवी' गुजरातीत आणण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे गुजराती नाटकाचं नावही 'ओवी' हेच कायम ठेवणार असल्याचं कळतयं. अनिकेत सध्या कलाकारांच्या शोधात असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज