अ‍ॅपशहर

पुन्हा रंगणार ‘गोष्ट’

मुंबई टाइम्स टीम चारशे प्रयोगांचा टप्पा ओलांडणारं 'गोष्ट तशी गमतीची' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय...

Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am

मुंबई टाइम्स टीम

चारशे प्रयोगांचा टप्पा ओलांडणारं 'गोष्ट तशी गमतीची' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. सुमारे सहा महिने या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर येत्या ४ ऑगस्टला हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतंय. या नाटकाचे ४१० प्रयोग झाले असून, गडकरी रंगायतनला ४११ वा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात तीच टीम कायम असेल. अभिनेता शशांक केतकर याबाबत म्हणाला, की 'काही नाटकं अशी असतात जी पुन:पुन्हा बघितली तरी कंटाळा येत नाही. त्यातलंच हे एक नाटक आहे. अर्थात, हे मी नव्हे तर नाटक बघायला घेणारा प्रेक्षक आम्हाला सांगत असतो. आजवरच्या चारशे प्रयोगांपकी साधारण शंभर प्रयोग पुण्यात झाले असतील. ते सर्व प्रयोग जितू भागवत या नाटकाच्या फॅननं बघितले आहेत. प्रेक्षकांचं अमाप प्रेम हेच कारण असेल पुन्हा नाटक सुरू होण्याचं.' अद्वैत दादरकरदिग्दर्शित आणि मिहीर राजदालिखित या नाटकात शशांकसह मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज