टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ही बॉलिवूडमधली सध्या सर्वाधिक चर्चेतली जोडी आहे. 'बागी २' चित्रपटानंतर त्यांनी त्यांच्या मानधनात घसघशीत वाढ केलीय. विशेषत: दिशानं आपलं मानधन चांगलंच वाढवल्याची चर्चा आहे. अनेक फिल्ममेकर्स आणि ब्रँडस त्यांच्याकडे विचारणा करताहेत. एका कंपनीने त्या दोघांना एकत्र ब्रँड अॅम्बॅसेडर होण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पाच कोटी मानधन सांगितलं म्हणे. ते ऐकून कंपनीचे डोळे पांढरे झाले.
मानधन पाच कोटी?
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ही बॉलिवूडमधली सध्या सर्वाधिक चर्चेतली जोडी आहे 'बागी २' चित्रपटानंतर त्यांनी त्यांच्या मानधनात घसघशीत वाढ केलीय...
Maharashtra Times 14 Jul 2018, 4:00 am