प्रयोगशील अभिनेता आलोक राजवाडे लवकरच दिग्दर्शक म्हणून स्वतःचा सिनेमा घेऊन येतोय. धर्मकीर्ती सुमंतलिखित या सिनेमाचं नाव 'काम चालू रस्ता बंद' असल्याचं समजतं. या सिनेमातील काही भूमिकांसाठी आलोक उत्साही कलाकारांच्या शोधात आहे. तसं त्यानं सोशल मीडियावर जाहीरही केलंय. अलीकडेच या युवा रंगकर्मीचं नाव प्रतिष्ठेच्या 'फोर्ब्ज इंडिया' मासिकात झळकलं होतं. त्यामुळे त्याच्या नव्या सिनेमाकडून सगळ्यांच्या अपेक्षा आणखीनच उंचावल्या आहेत.
अपेक्षा वाढल्या
अलीकडेच या युवा रंगकर्मीचं नाव प्रतिष्ठेच्या 'फोर्ब्ज इंडिया' मासिकात झळकलं होतं. त्यामुळे त्याच्या नव्या सिनेमाकडून सगळ्यांच्या अपेक्षा आणखीनच उंचावल्या आहेत.
Maharashtra Times 5 Oct 2017, 12:49 am