आमीर खानचा आगामी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्ता’ हा सिनेमा प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’वर आधारित असल्याची जोरदार चर्चा इंडस्ट्रीत होती. पण खुद्द आमीरनंच याचा इन्कार केला आहे. तो म्हणाला, की ‘हा सिनेमा इतर कोणत्याही सिनेमावरून प्रेरित नाही. हासुद्धा एक अॅक्शन आणि साहसपट आहे. पण त्याची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ’ विजय आचार्य याचं दिग्दर्शन करत असून, अमिताभ, कतरिना आणि फातिमा सना शेख यांच्या यात भूमिका आहेत.
कुणाचीही नक्कल नाही
पण त्याची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ’ विजय आचार्य याचं दिग्दर्शन करत असून, अमिताभ, कतरिना आणि फातिमा सना शेख यांच्या यात भूमिका आहेत.
Maharashtra Times 26 May 2017, 12:18 am