'मी परफेक्शनिस्ट वगैरे नाही. हा माझ्यासाठी चुकीचा किताब आहे. मला अभिनयाची आवड आहे, त्याविषयी प्रेम आहे. त्यामुळे हवं तर मला ‘मिस्टर पॅशनेट’ म्हणा, पण ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ नको!'…हे म्हणणं आहे दस्तुरखुद्द आमीर खानचं. लोक त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट मानत असले तरी त्याला स्वतःला तसं वाटत नाही. या आठ्वड्याखेरीस होणाऱ्या 'दंगल'च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी संवाद साधताना त्यानं हे सांगितलं. आमिरच्या या सिनेमानं अकराशे कोटीहून अधिक गल्ला जमवला असून, सर्वाधिक यशस्वी हिंदी चित्रपटाचा मान तो मिरवतो आहे.
मी नाही परफेक्शनिस्ट
मला अभिनयाची आवड आहे, त्याविषयी प्रेम आहे. त्यामुळे हवं तर मला ‘मिस्टर पॅशनेट’ म्हणा, पण ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ नको!'…हे म्हणणं आहे दस्तुरखुद्द आमीर खानचं.
Maharashtra Times 19 May 2017, 4:29 am