कलाकारांना सोशल मीडियावर चाहत्यांकडून फार वेगळ्या प्रतिक्रिया मिळतात. अलीकडेच अभिनेता अभिषेक बच्चन यानं कमेंट करणाऱ्या अशाच एका चाहत्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून चांगलंच सुनावलं. अभिषेकचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मनमर्झिया' चित्रपटासंदर्भात त्याच्या एका चाहत्यानं कमेंट केली की, 'दोन आठवडेही चित्रपट चालला नाही. अभिषेक एक असा कलाकार आहे जो कोणताही चांगला चित्रपट फ्लॉप करू शकतो. स्टारकिड्सना आता वडापाव विकायला हवं'. यावर तो म्हणाला की, 'तुमच्यासारख्या चाहत्यांनी आधी चित्रपटाबाबत योग्य ती माहिती घेऊन बोलावं'.
खडेबोल सुनावले!
कलाकारांना सोशल मीडियावर चाहत्यांकडून फार वेगळ्या प्रतिक्रिया मिळतात...
Maharashtra Times 28 Sep 2018, 9:37 am