मराठी तसंच दाक्षिणात्य संगीतविश्व गाजवणारी गायिका सावनी रवींद्र आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यासाठी तिनं टीव्ही मालिका किंवा सिनेमाची निवड न करता एका वेबसीरिजची निवड केली आहे. 'गालीमार' असं या नव्या वेबसीरिजचं नाव असून, अभिनेत्री अदिती विनायक त्याची निर्मिती करतेय. यात ती एका कॉर्पोरेटविश्वात वावरणाऱ्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. अभिनेता सुयश टिळकबरोबर तिची यात जोडी जमताना दिसेल. सावनीच्या या नव्या इनिंगची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
अभिनयात पदार्पण
मराठी तसंच दाक्षिणात्य संगीतविश्व गाजवणारी गायिका सावनी रवींद्र आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे...
Maharashtra Times 2 Jul 2018, 11:57 am