अनेक कलाकार असे आहेत ज्यांना लेखनाची आवड आहे. त्यामुळे त्यांचं पुस्तक कधी येईल या प्रतीक्षेत चाहते असतात. अभिनेता आयुषमान खुरानाही त्यापैकीच एक. सध्या एकामागोमाग एक चित्रपट करत असल्यामुळे त्याच्या पुस्तकाचं काम लांबणीवर पडलं आहे. तो म्हणतो, की 'जे माझ्या मनात येतं ते मी लगेच पोस्ट करतो. आता मात्र मला ते माझ्या पुस्तकासाठी काही गोष्टी राखून ठेवाव्या लागतील. सगळं आताच लिहून पोस्ट केलं तर पुस्तकात काय सांगणार?' त्यामुळे आजच्या पुस्तक दिनी आयुषमानचं पुस्तक येतंय ही चाहत्यांसाठी खूशखबर आहे.
अभिनेता आयुषमान खुरानाच पुस्तक लवकरच ....
अनेक कलाकार असे आहेत ज्यांना लेखनाची आवड आहे त्यामुळे त्यांचं पुस्तक कधी येईल या प्रतीक्षेत चाहते असतात अभिनेता आयुषमान खुरानाही त्यापैकीच एक. सध्या एकामागोमाग एक चित्रपट करत असल्यामुळे त्याच्या पुस्तकाचं काम लांबणीवर पडलं आहे.
MT 23 Apr 2019, 9:25 am