केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत गोळा झाली. काही बॉलिवूडस्टार्स स्वत: या मदतकार्यात उतरले आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं एका समाजसेवी संस्थेच्या मदतीनं पूरग्रस्तांसाठी सहा हजार घरं बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच ती केरळमधल्या पूरग्रस्त भागाला भेट देणार आहे. तिनं तिच्या चाहत्यांनाही केरळला येण्याचं आणि मदतीसाठी पुढे सरसावण्याचं आवाहन केलं आहे.
मदतीसाठी धाव
केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत गोळा झाली काही बॉलिवूडस्टार्स स्वत: या मदतकार्यात उतरले आहेत...
Maharashtra Times 11 Oct 2018, 3:51 pm