मुंबई :
अभिनेत्री श्रुती हासन आणि तिचा इटलीचा बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल यांनी नुकतंच ब्रेकअप केलं आहे. २०१६ मध्ये एका मित्राकडून लंडनमध्ये ओळख झाल्यांनतर त्यांनी आपल्या नात्याची सुरुवात केली होती. त्या नंतर मायकल अनेक वेळा भारतातही येऊन गेला होता. त्याने श्रुतीचे वडील, कमल हासन यांची भेटही घेतली होती. कमल हासन यांच्या 'विश्वरूपम 2' मध्ये त्याने सैनिकाची भूमिकाही निभावली होती. श्रुतीच्या ३३ व्या वाढदिवसादिवशी, २८ जानेवारीला हे जोडपं लॉस एंजिलिसमध्ये दिसलं होतं. अगदी मागच्या महिन्यापर्यंत दोघांच्यात सगळं सुरळीत चालू असताना अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
मायकलने गेल्याच महिन्यात श्रुतीसोबतचा फोटो 'माझी गर्लफ्रेंड' म्हणून सोशल मीडियावर शेअर केला होता. आणि त्या नंतर या दोघांनी सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असं काही जवळच्या सूत्रांकडून समजतं.
ब्रेकअप नंतरही या दोघात कोणतेही भांडण नसल्याचं दिसलं आहे. ते दोघं आता चांगले मित्र आहेत. असं असलं तरी ब्रेकअपनंतर श्रुतीने मायकलसोबतचे सोशल मीडियावरचे काही फोटोस डिलिट केले आहेत.