अजय देवगण आणि काजोल बऱ्याच दिवसांनंतर एका प्रोजेक्टवर काम करणार आहेत. 'इला' असं या नव्या चित्रपटाचं नाव असून, प्रदीप सरकार तो दिग्दर्शित करताहेत. काजोलनं हा सिनेमा साइन केला आहे. अजय या चित्रपटाचा निर्माता असून, तो यात अभिनय मात्र करणार नाहीय. एका गुजराती नाटकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. काजोल यात सिंगल मदरची भूमिका करणार असून, हा चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल.
अजय-काजोल एकत्र
अजय देवगण आणि काजोल बऱ्याच दिवसांनंतर एका प्रोजेक्टवर काम करणार आहेत. 'इला' असं या नव्या चित्रपटाचं नाव असून, प्रदीप सरकार तो दिग्दर्शित करताहेत. काजोलनं हा सिनेमा साइन केला आहे.
Maharashtra Times 21 May 2018, 10:30 am