बॉलिवुडमधल्या खास जोडप्यांमध्ये अक्षय-ट्विंकलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘नच बलिए’ या प्रसिद्ध डान्स शोच्या निर्मात्यांना हे दोघं परीक्षक म्हणून हवे होते. या दोघांची लोकप्रियता लक्षात घेता शोला चांगला प्रतिसाद मिळेल या आशेने निर्मात्यांनी अक्षय-ट्विंकलला ऑफर दिली; पण दोघांनी त्यासाठी नकार दिला. यापूर्वी अक्षयनं टीव्हीसाठी ‘खतरों के खिलाडी’चे काही सीझन केले आहेत; तर ट्विंकलनं टीव्हीवर एकदाही काम केलेलं नाही. त्यांच्या नकारानंतर आता परिणीती आणि शामक दावर यांच्याशी बोलणी सुरू असल्याचं कळतं.
अक्षय-टि्वंकलचा नकार
बॉलिवुडमधल्या खास जोडप्यांमध्ये अक्षय-ट्विंकलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘नच बलिए’ या प्रसिद्ध डान्स शोच्या निर्मात्यांना हे दोघं परीक्षक म्हणून हवे होते. या दोघांची लोकप्रियता लक्षात घेता शोला चांगला प्रतिसाद मिळेल या आशेने निर्मात्यांनी अक्षय-ट्विंकलला ऑफर दिली; पण दोघांनी त्यासाठी नकार दिला.
Maharashtra Times 24 Feb 2017, 12:45 am