‘एअरलिफ्ट’, ‘हाऊसफुल ३’ आणि आता ‘रुस्तम’ असे एकापाठोपाठ तीन हिट चित्रपट दिल्यानं अक्षय कुमार खूप खुशीत आहे. हे यश त्याने दणक्यात साजरं केलं. गेल्या आठवड्यात त्याच्या घरी झालेल्या धमाकेदार पार्टीची अजूनही चर्चा होतेय. अक्की त्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. पार्टी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून तो पुन्हा कामाला लागला आहे. सध्या अक्षय 'जॉली एल एल बी २'साठी शूटिंग करतोय. या शूटिंगसाठी त्यानं लगेच लखनऊ गाठलं. सहअभिनेत्री हुमा कुरेशीसोबत 'नवाबों की नगरी'मधून सकाळी-सकाळीच त्यानं चाहत्यांना सलाम केला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.
अक्कीचा सलाम
‘एअरलिफ्ट’, ‘हाऊसफुल ३’ आणि आता ‘रुस्तम’ असे एकापाठोपाठ तीन हिट चित्रपट दिल्यानं अक्षय कुमार खूप खुशीत आहे. हे यश त्याने दणक्यात साजरं केलं. गेल्या आठवड्यात त्याच्या घरी झालेल्या धमाकेदार पार्टीची अजूनही चर्चा होतेय. अक्की त्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे.
Maharashtra Times 1 Sep 2016, 8:02 am