पहिली भेट नेहमीच लक्षात राहते. त्यातून ती बिग बींची असेल तर, नक्की राहणारच. अक्षय कुमारनं त्याची ही आठवण नुकतीच सांगितली. एकदा उटीमध्ये बिग बीचं शूट सुरू असताना अक्षय त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागायला गेला. तेव्हा तो लहान होता. बिग बी ऑटोग्राफ देत असताना अक्षयची नजर त्यांच्यासमोर असणाऱ्या द्राक्षांकडे होतो. बच्चन यांनी ते बरोब्बर ओळखलं. आणि जाताना त्याला त्यातली द्राक्ष दिली. ती द्राक्ष आंबट होती, पण ही आठवण माझ्यासाठी गोड आहे, असं त्यानं गमतीत सांगितलं.
द्राक्ष आंबट की गोड?
पहिली भेट नेहमीच लक्षात राहते. त्यातून ती बिग बींची असेल तर, नक्की राहणारच. अक्षय कुमारनं त्याची ही आठवण नुकतीच सांगितली. एकदा उटीमध्ये बिग बीचं शूट सुरू असताना अक्षय त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागायला गेला.
Maharashtra Times 5 Dec 2017, 12:55 am