येत्या काही दिवसांत एका सिनेमाचा मुहूर्त होतोय. तो ठरला आहे एका मोठ्या आलिशान पंचतारांकित हॉटेलात. सगळा तामझाम मोठा आहे. हा मुहूर्त करण्यासाठी दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन येणार आहेत. त्यामुळे सगळे कलाकार आधीच सुखावून गेले आहेत. पण गंमत अशी, की या सिनेमाचं नाव ऐकून मात्र प्रत्येकाच्या भुवया वर जातायंत. कारण याचं नाव आहे ‘भिकारी’. उंची हॉटेल.. प्रतिष्ठित कलाकार असूनही सिनेमाचं ‘भिकारी’ असल्यामुळे लोकांना गंमत वाटतेय. हे नेमकं काय चाललंय हे कळत नाहीय. पण साक्षात बिग बी या सिनेमाच्या मुहूर्ताला येत असल्यामुळे, सिनेमाबद्दल मात्र प्रत्येकाला उत्सुकता वाटून राहिली आहे. आता बघू हा ‘भिकारी’ कसा आहे ते.
‘भिकारी’साठी बिग बींची क्लॅप
Maharashtra Times 6 Dec 2016, 12:48 am