अ‍ॅपशहर

चर्चा दाढीची

अमिताभ बच्चन यांची फ्रेंच बिअर्ड दाढी ही त्यांची खास ओळख बनली आहे. गेल्या कित्येक वर्षांत दाढीशिवाय त्यांचा चेहरा कुणी पाहिलेला नाही.

Maharashtra Times 28 Jun 2016, 12:52 am
अमिताभ बच्चन यांची फ्रेंच बिअर्ड दाढी ही त्यांची खास ओळख बनली आहे. गेल्या कित्येक वर्षांत दाढीशिवाय त्यांचा चेहरा कुणी पाहिलेला नाही. पण गुळगुळीत दाढी केलेले बिग बी ‘तीन’मधल्या काही दृश्यांमध्ये दिसले. या भूमिकेचंही खूप कौतुक केलं जातंय. गेली अनेक वर्ष दाढी ठेवणाऱ्या अमिताभ यांना दाढी काढायला लावणं हे खूप मोठे आव्हान होतं, असं दिग्दर्शक रिभू दासगुप्ता सांगतो. सुरूवातीला काही केल्या बच्चन यासाठी तयार नव्हते म्हणे. पण नंतर रिभूनं त्यांना कसंबसं तयार केल्याचं कळतं. भूमिकेची गरज समजावून दिल्यावर त्यांनी दाढी काढून टाकली. मात्र त्यामुळे बिग बींना जवळपास दीडएक महिन्यासाठी त्यांच्या नवीन जाहिरातींचं शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज