बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाची सातत्याने चर्चा होते आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आलेल्या पिंकने व्यवसाय केलाच. त्यासह समीक्षकांची मनेही जिंकली. पिंक ही एक चळवळ असल्याचं सांगत बिग बी यांनी आपल्या घरावरही पिंक लाइट टाकला होता. इंडस्ट्रीचा या बादशाहला इंडस्ट्रीत येऊन ४७ वर्षं पूर्ण झाली. सात हिंदूस्थानी हा त्यांचा सिनेमा ७ नोव्हेंबरलाच प्रदर्शित झाला होता. आपल्या चार दशकांच्या या प्रवासाचे सर्व श्रेय बच्चन यांनी सिनेइंडस्ट्री आणि प्रेक्षक, चाहत्यांना दिलं आहे. ७४ वर्षांचा हा एव्हरग्रीन नायक आजही एखाद्या सुपरस्टारला लाजवले इतका बिझी आहे.
सत्तेचाळीशी पूर्ण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाची सातत्याने चर्चा होते आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आलेल्या पिंकने व्यवसाय केलाच. त्यासह समीक्षकांची मनेही जिंकली. पिंक ही एक चळवळ असल्याचं सांगत बिग बी यांनी आपल्या घरावरही पिंक लाइट टाकला होता.
Maharashtra Times 10 Nov 2016, 12:19 am