अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच युवराज सिंगच्या फॅशन वेबसाइटच्या लाँचला हजेरी लावली. तिथं त्यांना प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर भेटले. दोघांच्या गप्पा सुरु असतानाचा एक फोटो नंतर बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये अविनाश यांची बायकोही दिसतेय. 'अविनाश, बायकोचं म्हणणं ऐकत जा' अशी एक गमतीदार फोटो ओळ त्यांनी फोटोसाठी लिहिलीय. साक्षात बिग बी यांनी हे सांगितलं आहे. म्हणजे ते स्वतः जया बच्चन यांचं म्हणणं कसं तंतोतंत पाळत आलेत हे दिसून येतंय. इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी अमिताभ यांचा हा मोलाचा सल्ला मनावर घ्यायला हवा, नाही का?
ऐकावं बायकोचं
'अविनाश, बायकोचं म्हणणं ऐकत जा' अशी एक गमतीदार फोटो ओळ त्यांनी फोटोसाठी लिहिलीय. साक्षात बिग बी यांनी हे सांगितलं आहे. म्हणजे ते स्वतः जया बच्चन यांचं म्हणणं कसं तंतोतंत पाळत आलेत हे दिसून येतंय. इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी अमिताभ यांचा हा मोलाचा सल्ला मनावर घ्यायला हवा, नाही का?
Maharashtra Times 5 Sep 2016, 8:23 am