ग्लॅमरस भूमिकांच्या मागे न पळता आपल्या संवेदनशील अभिनयानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. अमृता सध्या विक्रमादित्य यांच्या एका लघुपटात काम करतेय. या लघुपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असलं, तरी विक्रमादित्य आणि अमृता यांच्या फॅन्समध्ये लघुपटविषयी खूप उत्सुकता आहे. 'रमण राघव' सिनेमात यापूर्वी अमृतानं विक्रमादित्य यांच्यासोबत काम केलं होतं.
अमृता-विक्रमादित्य एकत्र
ग्लॅमरस भूमिकांच्या मागे न पळता आपल्या संवेदनशील अभिनयानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष...
Maharashtra Times 22 Sep 2018, 4:00 am