मनोरंजनसृष्टीत नेहमी पराकोटीची स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे एकमेकांचं कौतुक करणं अपवादानंच घडतं. अभिनेत्री अमृता सुभाष मात्र याला अपवाद आहे. 'रिंगण'फेम शशांक शेंडे, अभय महाजन यांच्याबद्दल लिहिताना सिनेमाचा दिग्दर्शक मकरंद मानेबद्दल एक खास आठवण तिनं शेअर केलीय. 'अवघाची…’च्या सेटवर ‘ताई, शॉट रेडी आहे’ सांगणारा हा मुलगा त्यानंतर मला भेटला तो तडक कान चित्रपटमहोत्सवाच्या रेड कार्पेटवर, रिंगणसाठी! त्याचा हा प्रवास पाहून मला अभिमान वाटतोय' असं तिनं सोशल मीडियावर लिहिलं आहे.
अभिमान वाटतोय
'अवघाची…’च्या सेटवर ‘ताई, शॉट रेडी आहे’ सांगणारा हा मुलगा त्यानंतर मला भेटला तो तडक कान चित्रपटमहोत्सवाच्या रेड कार्पेटवर, रिंगणसाठी! त्याचा हा प्रवास पाहून मला अभिमान वाटतोय' असं तिनं सोशल मीडियावर लिहिलं आहे.
Maharashtra Times 5 Jul 2017, 12:40 am