काही ठिकाणी डॉक्टरांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे अभिनेता अजय देवगण संतापला आहे. त्यानं ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. 'सुशिक्षित लोकांकडून असं होत असल्याचा संताप येतोय. असे असंवेदनशील लोक म्हणजे गुन्हेगारच म्हणावे लागतील', असं तो म्हणतो. अजयनं केलेल्या ट्विटला हजारो नेटकऱ्यांकडून पाठिंबा मिळतोय. त्याचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर रिट्विट केलं जातंय.
संताप येतोय
काही ठिकाणी डॉक्टरांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे अभिनेता अजय देवगण संतापला आहे त्यानं ट्विट करून आपला संताप व्यक्त केला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2020, 4:00 am