डिजिटल माध्यमाच्या वाढत्या प्रभावाबद्दल सध्या खूप बोललं जातं. तरुणाईचा लाडका अभिनेता अर्जुन कपूरनंही यावर आपलं मत मांडलं आहे. 'डिजिटल माध्यमाचा वाढता प्रसार बघता, भविष्यात मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतीचा दर्जाही आणखी सुधारायला हवा' असं त्यानं सोशल मीडियावर म्हटलं आहे. केवळ ट्रेंडला फॉलो न करता, नेमका कुठला आशय डाऊनलोड करून बघितला जातोय याची शहानिशा व्हायला हवी असं हा जवान छोकरा सांगतो. सिनेमाबद्दलची त्याची कळकळ, जाण पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.
सिनेमावर चर्चा
केवळ ट्रेंडला फॉलो न करता, नेमका कुठला आशय डाऊनलोड करून बघितला जातोय याची शहानिशा व्हायला हवी असं हा जवान छोकरा सांगतो. सिनेमाबद्दलची त्याची कळकळ, जाण पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.
Maharashtra Times 18 Nov 2017, 12:59 am