फराह खानच्या घरची मेजवानी म्हटल्यावर सगळे बॉलिवूडकर आवर्जून एकत्र जमतात. अलीकडे या ग्लॅमरस कॅम्पमध्ये आणखी एक नवीन सदस्य बघायला मिळाला. तो म्हणजे मराठमोळा आशुतोष गोवारीकर. फराहनं अलीकडेच तिच्या डिनरपार्टीला झोया अख्तर, फरहान अख्तर, करण जोहर, भाऊ साजिद खान आशा एकूण ९ दिग्दर्शकांना घरी बोलावलं होतं. यात आशुतोषचा समावेश होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा एकत्र फोटो आशुतोषचा भाऊ आणि प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकरनंच काढला.
नवा सदस्य?
यात आशुतोषचा समावेश होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा एकत्र फोटो आशुतोषचा भाऊ आणि प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकरनंच काढला.
Maharashtra Times 18 Apr 2017, 11:23 am