अ‍ॅपशहर

‘बडे मियां…’चा होतोय रिमेक

जवळपास अठरा वर्षांपूर्वी आलेल्या 'बडे मिया छोटे मियां' या सिनेमानं प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं होतं. अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा या सिनेमात डबल रोल होता.

Maharashtra Times 25 Jun 2016, 12:31 am
जवळपास अठरा वर्षांपूर्वी आलेल्या 'बडे मिया छोटे मियां' या सिनेमानं प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं होतं. अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा या सिनेमात डबल रोल होता. डेव्हिड धवन यांच्या या सिनेमाचा रिमेक लवकरच बनणार असून, त्याची जबाबदारी आता वासू भगनानी यांच्याकडे आहे. या रिमेकमध्ये नेमके कोण कलाकार असणार आहेत यावर बरीच चर्चा सुरू आहे. त्याबद्दल थेट वासू यांच्याशी संपर्क साधला असता, गोविंदा आणि बच्चन सरांना किमान एका सीनसाठी का होईना पण सिनेमात येण्यासाठी मी विनंती करणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते सिनेमासाठी होकार देण्याची शक्यता कमी आहे. पण गोविंदा मात्र शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचं समजतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज