‘बालिका वधू’फेम अभिनेत्री अविका गौर लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे. बराच काळ सुरू असलेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत तिनं एक भूमिका साकारली होती. मधल्या काळात बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नसलं, तरी दाक्षिणात्य चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली. मात्र आता तिनं परत टीव्हीची वाट धरली आहे. ‘लाडो २- वीरपूर की मर्दानी’ या नव्या मालिकेत तिची महत्त्वाची भूमिका असेल. खुद्द अविकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय.
‘लाडो’ परत येतेय
मात्र आता तिनं परत टीव्हीची वाट धरली आहे. ‘लाडो २- वीरपूर की मर्दानी’ या नव्या मालिकेत तिची महत्त्वाची भूमिका असेल. खुद्द अविकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय.
Maharashtra Times 27 Oct 2017, 2:21 pm