विनोदी अभिनेता भाऊ कदमचा एक गमतीदार फोटो सध्या व्हॉटसअॅपवर फिरतोय. या फोटोसोबत, ‘भाऊ एका कॉलेजमध्ये अॅडमिशनच्या रांगेत उभा आहे’ असं म्हटलं आहे. याबाबत भाऊलाच विचारलं असता तो म्हणाला की 'हो, हे खरं आहे. मी माझी मुलगी मृण्मयीच्या अॅडमिशनसाठी जोशी-बेडेकरमध्ये गेलो होतो. ती प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण झाली असून तिनं कॉमर्सला प्रवेश घेतलाय. मी सुरुवातीला रांगेतच उभा होतो.' मात्र तिथं भाऊला भेटायला खूप गर्दी झाली. अखेर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पुढे होऊन भाऊचं काम करून दिलं.
अॅडमिशनच्या रांगेत भाऊ
मात्र तिथं भाऊला भेटायला खूप गर्दी झाली. अखेर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पुढे होऊन भाऊचं काम करून दिलं.
Maharashtra Times 24 Jul 2017, 12:38 am