एखाद्या रिअॅलिटी शोमधून पुढे आलेल्या तरुणांना चित्रपटामध्ये संधी मिळणं, हे तसं दुर्मिळच. पण बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूर यांनी अशाच काही तरुणांना एवढी मोठी संधी दिली आहे. त्याचं झालं असं की, अनिल कपूर हे अलीकडेच 'दिल है हिंदुस्थानी २' या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेले होते. त्यावेळी रॅप गाणं सादर करणाऱ्या स्पर्धकांचं कौशल्य पाहून अनिल कपूर यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटामध्ये त्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं. त्या दोघांपैकी अक्षय ढवण हा मराठमोळा स्पर्धक आहे.
मोठी संधी
एखाद्या रिअॅलिटी शोमधून पुढे आलेल्या तरुणांना चित्रपटामध्ये संधी मिळणं, हे तसं दुर्मिळच...
Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am