कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या बेंगळुरूमध्ये आहे. तिथल्या एक आयुर्वेदिक उपचार केंद्रात तो उपचार घेतोय. खुद्द कपिलनंच ही गोष्ट जाहीर केली आहे. कपिलच्या शोची लोकप्रियता घसरल्यानं चॅनेलनं कपिलला बाय-बाय करायचं ठरवलंय असं बोललं जातंय. पण, कपिल मात्र ही गोष्ट नाकारतो. ‘गेल्या दहा वर्षांपासून मी सतत काम करतोय. त्यामुळे माझ्या तब्येतीवर खूप परिणाम झालाय. चांगले उपचार घेऊन मी सप्टेंबर अखेरीस परतेन आणि नव्या जोमानं कामाला सुरुवात करेन’ असं तो म्हणतो.
कपिलचा ब्रेक
कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या बेंगळुरूमध्ये आहे. तिथल्या एक आयुर्वेदिक उपचार केंद्रात तो उपचार घेतोय. खुद्द कपिलनंच ही गोष्ट जाहीर केली आहे. कपिलच्या शोची लोकप्रियता घसरल्यानं चॅनेलनं कपिलला बाय-बाय करायचं ठरवलंय असं बोललं जातंय.
Maharashtra Times 8 Sep 2017, 12:52 am