अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातल्या 'मधुर' संबंधांची खूप चर्चा आहे. त्यांच्यापैकी कुणीही उघडपणे यावर बोलायला तयार नाही. ते दोघं अनेकदा डिनर डेटवर जाताना दिसतात. अलीकडेच अर्जुन मलायकाच्या घरातून बाहेर पडताना दिसला. ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये असलेल्या अर्जुनवर फोटोग्राफर्सची नजर पडली आणि फटाफट फ्लॅश उडू लागले. दोघांनी मिळून एक नवीन फ्लॅट घेतला असून, सध्या त्याच्या अंतर्गत सजावटीचं काम सुरू असल्याचं कळतंय.
कॅमेऱ्यात कैद
अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातल्या 'मधुर' संबंधांची खूप चर्चा आहे त्यांच्यापैकी कुणीही उघडपणे यावर बोलायला तयार नाही...
Maharashtra Times 13 Dec 2018, 4:00 am