मोठमोठ्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमात बोलावून त्यांची खिल्ली उडवणाऱ्या कृष्णा अभिषेक या विनोदवीराने म्हणे स्वतःच्या बहिणीलाही सोडलं नाही. या कार्यक्रमात त्यानं तिचीही मनसोक्त खिल्ली उडवली. कलर्स वाहिनीच्या 'कॉमेडी नाईट बचाओ' या कॉमेडी शोमध्ये कृष्णा अनेक कलाकारांचं रोस्ट करत असतो. त्याची बहिण आणि अभिनेत्री आरती सिंग या आठवड्यात त्याच्या शोमध्ये आली होती. बॉक्स क्रिकेट लीगच्या अहमदाबाद एक्स्प्रेस संघातल्या काही सहकलाकारांसोबत शोमध्ये हजेरी लावलेल्या आरतीची कृष्णाने भरपूर चेष्टा केली. इतकी की शेवटी तिलाही 'बचाओ' असं ओरडावं लागलं. शेवटी 'असा भाऊ असेल तर शत्रूचीही गरज नाही' असा टोमणा मारून आरतीनेही त्याची चांगलीच फिरकी घेतली.
भावानंच केलं रोस्ट
कलर्स वाहिनीच्या 'कॉमेडी नाईट बचाओ' या कॉमेडी शोमध्ये कृष्णा अनेक कलाकारांचं रोस्ट करत असतो. त्याची बहिण आणि अभिनेत्री आरती सिंग या आठवड्यात त्याच्या शोमध्ये आली होती. बॉक्स क्रिकेट लीगच्या अहमदाबाद एक्स्प्रेस संघातल्या काही सहकलाकारांसोबत शोमध्ये हजेरी लावलेल्या आरतीची कृष्णाने भरपूर चेष्टा केली. इतकी की शेवटी तिलाही 'बचाओ' असं ओरडावं लागलं.
Maharashtra Times 2 Apr 2016, 12:56 am