आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' या आगामी सिनेमात त्याच्यासोबत हिरॉइन म्हणून सान्या मल्होत्रा दिसणार आहे. सान्यानं 'दंगल'मध्ये तिनं बबिता फोगटची भूमिका साकारली होती. सान्यानं अलीकडेच रितेश बत्राच्या 'फोटोग्राफर'चं शूटिंग पूर्ण केलं. 'बधाई हो'चं शूटिंग दिल्लीत होणार आहे. 'मला वाटतं माझ्यासाठी ही भूमिका फारशी कठीण नसेल. कारण मला यात कुस्ती करायची नाहीय' असं ती गमतीत म्हणते. अमित शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
सान्याला ‘बधाई’
आयुषमान खुरानाच्या 'बधाई हो' या आगामी सिनेमात त्याच्यासोबत हिरॉइन म्हणून सान्या मल्होत्रा दिसणार आहे. सान्यानं 'दंगल'मध्ये तिनं बबिता फोगटची भूमिका साकारली होती.
Maharashtra Times 4 Dec 2017, 12:08 am