इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला काही ना काही वेगळं करून पाहायचं असतं. अभिनेता नील नितीन मुकेश आता निर्मितीमध्ये पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अद्याप त्याच्या चित्रपटाचं नाव कळलेलं नाही. पण, या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याचा भाऊ नमन करणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रपटाची कथा स्वतः नीलनंच लिहिली आहे. ही एक रोमांचक कहाणी असल्याचं समजतंय. त्यामुळे नीलच्या या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल.
निर्मितीत पाऊल
इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला काही ना काही वेगळं करून पाहायचं असतं अभिनेता नील नितीन मुकेश आता निर्मितीमध्ये पाऊल टाकण्याच्या विचारात आहे...
Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am