सध्या बी-टाऊनमध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे 'पद्मावती'मधल्या दीपिका पडुकोणच्या आगळ्यावेगळ्या लूकची. या सिनेमाच्या फर्स्ट लूकमधून दीपिकाला पाहिल्यानंतर त्याविषयी खूप बोललं जातंय. विशेषतः तिच्या युनीब्रो, म्हणजे दोन्ही भुवया जोडलेल्या दाखवण्यात आल्यानं नेटिझन्समध्ये दोन गट झालेत. काही जण डिप्सची खिल्ली उडत आहेत. तर काहींच्या मते हे भविष्यातलं फॅशन स्टेटमेंट आहे. विशेष म्हणजे दीपिकाच्या आधीपासून गेले अनेक वर्षं काजोलही ही स्टाइल फॉलो करतेय.
जोडलेल्या भुवयांची चर्चा
काही जण डिप्सची खिल्ली उडत आहेत. तर काहींच्या मते हे भविष्यातलं फॅशन स्टेटमेंट आहे. विशेष म्हणजे दीपिकाच्या आधीपासून गेले अनेक वर्षं काजोलही ही स्टाइल फॉलो करतेय.
Maharashtra Times 23 Sep 2017, 12:59 am