‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानीच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. काही काळासाठी ती मालिकेत दिसणार नसल्याचं समजतं. दिशानं अलीकडेच मालिकेतला तिचा शेवटचा भाग चित्रीत केलाय. गरोदर असल्यानं ती प्रसूतीच्या रजेवर गेलीय. याआधी गेल्या आठ महिन्यांपासून मालिकेची संपूर्ण टीम दिशाची खूप काळजी घेत होती. आता गोड बातमी मिळाल्यावरच काही दिवसांनी तिची मालिकेत परत एंट्री होणार असल्याचं समजतं.
मिस यू दिशा
याआधी गेल्या आठ महिन्यांपासून मालिकेची संपूर्ण टीम दिशाची खूप काळजी घेत होती. आता गोड बातमी मिळाल्यावरच काही दिवसांनी तिची मालिकेत परत एंट्री होणार असल्याचं समजतं.
Maharashtra Times 23 Sep 2017, 12:02 am