आज शेकडोंनी मनोरंजन चॅनेल्स सुरू असली तरी लाखो प्रेक्षकांच्या मनात दूरदर्शनचं स्थान काही औरच आहे. नव्या स्टार्सनाही दूरदर्शनबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. आपल्या आयुषमान खुरानाचंच घ्या ना. पठ्ठ्या इतका बिझी आहे, तरी आजुबाजूला काय चाललंय याकडे त्याचं लक्ष आहे. दूरदर्शनचा लोगो बदलणार असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. पण आयुषमानला हे आवडलेलं नाही. ‘कृपया, दूरदर्शनचा लोगो बदलू नका. माझ्या बालपणीची ती खूप छान आठवण आहे’, अशी विनंतीच त्यानं सोशल मीडियावर केली आहे.
लोगो बदलू नका
‘कृपया, दूरदर्शनचा लोगो बदलू नका. माझ्या बालपणीची ती खूप छान आठवण आहे’, अशी विनंतीच त्यानं सोशल मीडियावर केली आहे.
Maharashtra Times 28 Jul 2017, 12:42 am