करोनामुळे धास्तावलेले कलाकार सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळू लागले आहेत. अभिनेत्री डेझी शाह स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची अशाच प्रकारे काटेकोरपणे काळजी घेते आहे. कुटुंबाला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तिनं घरातून बिलकूल बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला तिनं घरातच कोंडून घेतलं आहे. पुढचे काही दिवस मी आणि माझ्या कुटुंबियांपैकी कुणी कुठल्याही कारणास्तव घरातून बाहेर पडणार नाही असं तिनं सांगितलं आहे.
घराबाहेर जायचं नाही
करोनामुळे धास्तावलेले कलाकार सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळू लागले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2020, 4:00 am