शूटिंग, कार्यक्रमांमध्ये कितीही बिझी असलं, तरी सणासुदीला कलाकार आपल्या घरी राहणं पसंत करतात. कंगना रनौटचंच उदाहरण घ्या. यंदाची दिवाळी ती आपल्या मनालीतल्या नव्या घरी साजरी करणार आहे. अलीकडेच तिनं 'मणिकर्णिका...' या चित्रपटाचं शूटिंग संपवलं. त्यानंतर लगेचच तिच्या 'पंगा' या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी ती कबड्डीचं प्रशिक्षण घेणार आहे. पण, त्याआधी तीन-चार दिवस ती नव्या घरी दिवाळी साजरी करते आहे.
आधी दिवाळी
शूटिंग, कार्यक्रमांमध्ये कितीही बिझी असलं, तरी सणासुदीला कलाकार आपल्या घरी राहणं पसंत करतात कंगना रनौटचंच उदाहरण घ्या...
Maharashtra Times 7 Nov 2018, 4:00 am