'अंदाज अपना अपना' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये रणवीर सिंग आणि रणबीर कपूर असल्याची चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे. सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे, अशीही चर्चा आहे. 'आधीच लोकप्रिय असलेल्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही. तसंच रणबीरसोबत काम करायला मला खूप आवडेल', असं रणवीरने जाहीरपणे सांगितलं. त्याच्या या वक्तव्याचा रोहित शेट्टी कितपत विचार करेल हे लवकरच कळेल. पण या निमित्तानं हिंदीतले दोन सुपस्टार पहिल्यांदा एकत्र येऊन धमाल करतील यात शंका नाही.
दो का धमाका!
'अंदाज अपना अपना' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये रणवीर सिंग आणि रणबीर कपूर असल्याची चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे...
30 31 Dec 2018, 4:00 am