पदार्पणातला चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्या कलाकाराचा पुढचा सिनेमा चालतोच असं नाही. सुपरहिट 'दंगल'फेम फातिमा सना शेखचं असंच झालं. तिचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चांगलाच आपटला. त्यानंतर ती कुठल्याच चित्रपटात का दिसत नाही, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये होऊ लागली. पण, लवकरच ती 'भूत पोलीस' या चित्रपटात दिसणार आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. 'अशा प्रकारच्या सिनेमांची मी चाहती आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं', असं ती सांगते.
‘ठग्ज...’नंतर ‘भूत पोलीस’
पदार्पणातला चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्या कलाकाराचा पुढचा सिनेमा चालतोच असं नाही सुपरहिट 'दंगल'फेम फातिमा सना शेखचं असंच झालं...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2019, 8:19 am