आधी पाकिस्तानी मालिका आणि आता बॉलिवूडच्या सिनेमांमधून प्रेक्षकांचा आवडता बनलेला तरुण अभिनेता म्हणजे फवाद खान. फवादचा 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यातल्या उत्तम अभिनयामुळे त्यानं इंडस्ट्रीतल्या लोकांची मनं जिंकली आहेत. शिवाय, अनेक निर्मात्यांनाही तो आवडू लागला आहे. त्याने आपल्या सिनेमात काम करावं अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या आगामी सिनेमासाठीही फवादला विचारणा झाली आहे. नितीन कक्कड या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. पुढच्या वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याचं समजतं.
सलमानच्या सिनेमात फवाद?
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या आगामी सिनेमासाठीही फवादला विचारणा झाली आहे. नितीन कक्कड या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. पुढच्या वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याचं समजतं.
Maharashtra Times 24 Sep 2016, 12:12 am