काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या 'सडक' या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येतोय. विशेष म्हणजे, महेश भट पहिल्यांदाच त्यांच्या मुलीला, आलियाला दिग्दर्शित करणार आहेत. आलियानं नुकतंच महेश भट यांच्या सत्तराव्या वाढदिवशी सिनेमातल्या कलाकारांचा फोटो शेअर करत वडिलांचे आभार मानले आहेत. वडिलांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचं स्वप्न यानिमित्तानं पूर्ण होतं असं तिनं यावेळी सांगितलं. 'सडक'च्या सिक्वेलमध्ये संजय दत्त, पूजा भट, आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार असतील.
वडिलांबरोबर पहिलीच संधी
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या 'सडक' या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येतोय...
Maharashtra Times 22 Sep 2018, 4:00 am