'नवीन पोपट हा' या गाण्यावर सर्वांना थिरकवणारे महागायक आनंद शिंदे लवकरच 'नंदू नटवरे' या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा विनोदी चित्रपट असून लवकरच शूटिंगला प्रारंभ होईल. या चित्रपटामध्ये त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष जोशी हा प्रथमच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार असून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. त्याचबरोबर या चित्रपटासाठी आदर्श आणि उत्कर्ष यांच्या गाण्यांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटात शिंदेशाहीचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही.
प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत
'नवीन पोपट हा' या गाण्यावर सर्वांना थिरकवणारे महागायक आनंद शिंदे लवकरच 'नंदू नटवरे' या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा विनोदी चित्रपट असून लवकरच शूटिंगला प्रारंभ होईल.
Maharashtra Times 19 Feb 2018, 11:49 am