तरुणींचा आवडता अभिनेता हर्षवर्धन राणे नेहमी काही ना काही समाजोपयोगी काम करत असतो. मग ते पावसात अडकलेल्यांना मदत करणं असो वा गरिबांना मदत करणं असो. आता तो त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका संस्थेमधल्या मुलांना फुटबॉल शिकवणार आहे. तो स्वतः चांगला फुटबॉलपटू आहे. महिन्यातून किमान एकदा तरी वेळात वेळ काढून तो हे प्रशिक्षण देताना दिसेल. अलीकडेच याची सुरुवातही झाली. लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा माझा हा प्रयत्न असल्याचं हर्ष सांगतो.
फुटबॉल शिकवणार
अलीकडेच याची सुरुवातही झाली. लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा माझा हा प्रयत्न असल्याचं हर्ष सांगतो.
Maharashtra Times 12 Sep 2017, 12:21 am