घरचीच निर्मिती असली की त्या सिनेमात कुटुंबच्या कुटुंब दिसू शकतं. विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक याच्या सिनेमाच्या बाबतीत असं होताना दिसतंय. त्याची बायको काश्मीरा शहानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये तो काम करणार आहे. 'मरने भी दो यारो' असं त्याचं नाव आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी तो हृषीकेशला रवाना झाला आहे. तसंच त्याचा मेव्हणा देखील या सिनेमात असेल. घरच्या सिनेमात सगळेच आपली हौस भागवून घेताना दिसताहेत.
हौस पुरी
घरचीच निर्मिती असली की त्या सिनेमात कुटुंबच्या कुटुंब दिसू शकतं विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक याच्या सिनेमाच्या बाबतीत असं होताना दिसतंय...
Maharashtra Times 3 Oct 2018, 4:00 am