हिरोइन्सची लग्नं झाली, की काही महिन्यांतच त्यांच्याकडून गोड बातमी कधी समजेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. करीनाच्या बाळानंतर आता आणखी कुणाकडे ‘गुड न्यूज’ आहे का याची चर्चा सुरू आहे. विद्यालाही याबद्दल विचारल्यावर ती काहीशी उखडलीच. 'मूल असण्याचा हा काय हट्ट आहे? मी काही बेबी-मेकिंग मशीन नाही. आणि जगात लोकसंख्या वाढत आहे. काहींना मुलं नसतील तरी चालेल' असं ती म्हणाली. डॉक्टरांकडे गेले म्हणजे ते बाळंतपणासाठीच असं का समजलं जातं असा प्रश्नही ती विचारते.
मी मशीन नाहीय!
मूल असण्याचा हा काय हट्ट आहे? मी काही बेबी-मेकिंग मशीन नाही. आणि जगात लोकसंख्या वाढत आहे. काहींना मुलं नसतील तरी चालेल' असं ती म्हणाली. डॉक्टरांकडे गेले म्हणजे ते बाळंतपणासाठीच असं का समजलं जातं असा प्रश्नही ती विचारते.
Maharashtra Times 21 Mar 2017, 12:59 am